मौशिखांब येथे ‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत सुसज्ज अभ्यासिका सुरु.
गडचिरोली.(विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
मौशिखांब ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत सुसज्ज अभ्यासिका सुरू करून शिक्षण क्षेत्रात एक नवी क्रांतीच म्हणावे लागेल.
या नव क्रांतीमुळे गावातील व आजुबाजूच्या गाव परिसरातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनामध्ये अभ्यासासाठी स्वतंत्र, सुरक्षित व शिस्तबद्धता निर्माण करण्यात आलेली आहे.
तसेच.अभ्यासिकेमध्ये मुलांना बसण्याची सोय, प्रकाश व्यवस्था, पंखे तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना घरगुती अडचणींमुळे अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळत नसल्यामुळे . ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेऊन महत्वपूर्ण उपक्रम राबविला असून आजुबाजूच्या गाव परिसरातील. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण होताना दिसत आहे.
अभ्यासिकेच्या शुभारंभप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रंजिता पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपसरपंच सौ. रुपाली गांधरवार यांनी हा उपक्रम गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामविकास अधिकारी श्री. खुशाल नेवारे यांनी शासनाच्या विविध योजनांचा योग्य वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, सुधाकर गेडाम उपस्थित होते. ग्रामपंचायत मौशिखांबचे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश दहलकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सातत्य, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.
गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यातही अशा शैक्षणिक व विकासाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मौशिखांब ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी एक प्रेरणाचा म्हणावी लागेल.

