Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीविद्युत विभागाची हुकूमतशाही,! नागरिक त्रस्त.!

विद्युत विभागाची हुकूमतशाही,! नागरिक त्रस्त.!

विद्युत विभागाची हुकूमतशाही,! नागरिक त्रस्त.!

येणापूर (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

येणापूर ग्रामीण परिसरात कार्यरत असलेल्या विद्युत लाईनमेन लोकांची हुकमतशाही अगदी शिगेला पोहोचलेली असून. हम करे सो कायदा .ही परिस्थिती येणापूर सारख्या ग्रामीण परिसरात निर्माण होताना दिसत आहे.

या परिसरात कार्यरत असलेले व विद्युत विभागाची धुरा सांभाळणारे लाईनमेन घरगुती मीटरची रीडिंग न करतात ग्राहकांना बेअंदाजे बिल देऊन ग्राहकांना त्रस्त व मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचे येणापूर परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.

 ग्राहकांनी येणाऱ्या बिल्ला संदर्भात विद्युत विभागात जाऊन विचारणा केली असता.लाईनमेन लोकांकडून उडवा उडविचे उत्तरे देऊन. तुम्हाला येणारे बिल भरावेच लागेल अशी ताकी सुद्धा दिली जाते. विद्युत बिल न भरल्यास विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकी सुद्धा दिली जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

परिसरातील काही नागरिकांची असे म्हणणे आहे की, विद्युत मीटरची रीडिंग न करता  ग्राहकांना बेअंदाजे विद्युतबिल देऊन नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिले जात असल्याची तक्रार महिला कडून सुद्धा केली जात आहे.

 येणापूर येथे वास्तव्याने असलेल्या उज्वला बारसिंगे या महिलेच्या घरची रीडिंग न करता सदर महिलेला कधी .3000 तर कधी 5000 रुपयांचा विद्युत बिल पाठवून महिलेची दिशाभूल केली जात असल्याचे  सदर महिलेने आपली व्यथा आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त सुध्दा केलेली आहे. हे विशेष.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular