Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीप्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांचा शालेय प्रताप.

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांचा शालेय प्रताप.

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांचा शालेय प्रताप.

गडचिरोली. (जिल्हा प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

रामनगर नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असलेले प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांचा मनमानी कारभार अगदी शिगेला पोहोचलेला असून कार्यरत मुख्याध्यापक 25 वर्षा पासून एकाच शाळेत दडी मारून बसलेले आहेत.

25 वर्षा पासून एकाच शाळेत दडी मारून बसलेले प्रभारी मुख्याध्यापक गोहने यांची बदली का होत नाही,? . शाळकरी मुलांच्या पालकांनी तोंडांत बोटे घालून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत 

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांच्या 25 वर्षाच्या कालावधी मध्ये शाळेतील अनेक प्रताप समोर आलेले असून त्यांनी केलेले काही प्रताप डोनेशेच्या रूपाने. तर काही प्रताप मुलांच्या फी वसुलीच्या रूपाने समोर आलेले आहेत. सदर प्रकरणाला सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव मडावी यांनी सदर प्रकरण चव्हाट्यावर आणलेले आहेत.

गडचिरोली नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पाच वर्षाच्या प्रशासन कार्यकाळामध्ये आतापर्यंत त्यांनी 46 शिक्षकांच्या बदल्या केलेल्या असताना सुध्दा. प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांची बदली का केली नाही,?.गडचिरोली नगरात खमंग चर्चेला उधाण आलेले आहे.

सामाजिक कार्यकर्ते. माजी सभापती गुलाबराव मडावी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे अनेक तक्रारी दिल्या असताना सुध्दा. मुख्याधिकारी पीदुलकर यांनी प्रभारी मुख्याध्यापक गोहने यांची इतरत्र बदली न करता प्रभारी मुख्य मुख्यध्यापक गोहने यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांच्या बदली संदर्भात आमदार. खासदार .महसूल मंत्री यांचेकडे पाठपुरावा केले असताना व गोहने यांचेवर कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी यांना कळविले असताना सुध्दा प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने.हे प्रशासनावर वरचढ होताना दिसत आहेत.

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने यांच्या पंचीस वर्षात केलेल्या शालेय प्रतापाची त्वरित चौकशी करून मुख्याध्यापक गोहने यांची कोल्हापूर, सोलापूर या परिसरात बदली करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी नगरपरिषद सभापती गुलाबराव मडावी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular