Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीप्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांच्यावर निलंबनाच्या कारवाहीची मागणी.! गुलाबराव मडावी

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांच्यावर निलंबनाच्या कारवाहीची मागणी.! गुलाबराव मडावी

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांच्यावर निलंबनाच्या कारवाहीची मागणी.! गुलाबराव मडावी

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत 24 वर्षांपासून स्वतःची हक्कदारी व हुकूमतशाही गाजवीणारे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर विठ्ठलराव गोहने. यांनी आपल्या कार्यकाळात शासनाची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता साहित्य खरेदी .गणवेश खरेदी. संगणक दूरस्ती.वर्ग खोल्यांचे बांधकाम.स्टेज बांधकाम.खेळाचे साहित्य. वाटर टॅंक या सारख्या अनेक साहित्यांची खरेदी करून भ्रष्ट. व नियमबाह्य कामे करून लाखों रुपयांची उलाढाल केलेली आहे.

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांनी केलेल्या नियम बाह्य कामांना गडचिरोली नगरपरिषदचे मुख्याधिकारी पिडुलकर हे सुधीर गोहने यांची पाठराखंन व दप्तर दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहेत.

तसेच सन 2016 ते सन 2021 या कालावधी मध्ये गुलाबराव मडावी रामनगर प्रभागाचा नगर सेवक असताना सुध्दा नगरपरिषदने त्यांना शाळा व्यवस्थापन समितीमधून डावलण्यात सुधा आलेले आहे.

चोवीस वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्ट व नियमबाह्य कामाची त्वरित न्यायालयिन चौकशी करून प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व नगरपरिषदेचे माजी सभापती गुलाबराव मडावी यांनी केली आहे.

सुधीर विठ्ठलराव गोहने यांच्या भ्रष्ट व नियमबाह्य कामाची येत्या चार दिवसांत प्रशासनाने चौकशी न केल्यास नगरपरिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलनाला बसण्याचा संकल्प गुलाबराव मडावी यांनी केलेला आहे. प्रसंगी न्यायालयिन  लढाई लढण्याची तयारी सुध्दा दर्शविलेली आहे.

त्यांच्या  धरणे आदोलनाला शहरातील अनेक लोकांनी समर्थन सुध्दा दिलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular