रजिस्ट्रेशन नोंदणी विभागाचे स्थानांतर.!अडचणीसी सामना.
गडचिरोली, (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ओ.पी.डी परिसरात असलेली रजिस्ट्रेशन नोंदणी विभाग हटवून दुसरीकडे स्थानांतर केल्यामुळे.नोंदणी रजिस्ट्रेशन करताना रुग्णांना अनेक समस्या जाणवीत असल्याचे दिसून येत आहेत
तसेच रजिस्ट्रेशन नोंदणी रूम अतिशय लहान व नोंदणी परिसरात जागेची कमतरता व रुग्णांना बसण्यासाठी योग्य ती सुविधा नसल्यामुळे रुग्णांना नोंदणी विभागात तात्काळत उभे राहण्याची वेळ रुग्णावर आलेली आहे . नोंदणी विभागाच्या ठिकाणी पोलिस चौकी बसविण्यात आलेली आहे.
रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील अनेक विभागांचे स्थानांतर केल्यामुळे स्थानांतर झालेले विभाग रुग्ण व त्यांच्या नातेवाहिकांसाठी एक डोकेदुःखी ठरताना दिसत आहे.
रुग्णालय प्रशासनाने रजिस्ट्रेशन नोंदणी विभाग ओ . पी.डी परिसरात आणण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम यांनी केली आहे

