निर्दयी डॉक्टर उपलिंतीवार अपघाती मुलावर उपचारच केलेच नाही !
पोरला (प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
पोरला येथील प्रणय राजू शडमाके हा शाळेकरी मुलगा घराशेजारी स्कुटी शिकत असताना स्कुटी स्लिप होऊन खाली पडला. व त्याचा हातापायांना किरकोड दुखापत झाली.
त्याच्या सबंधित नातेवाईकांनी प्रणय या शाळेकरी मुलाला उपचारार्थ पोरला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता. पोराला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपलिंतीवार यांनी प्रणय शडमाके यांच्यावर उपचार न करता.आपल्या निवासस्थानात झोपा काढीत असल्याचे दिसून आले.
जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरची वारंवार विनवणी करून सुध्दा.डॉक्टर स्वतः न येता आरोग्य केंद्रातील कार्यरत सिस्टर विद्या मेश्राम यांच्यावर जबाबदारी टाकून आपले हात झटकून दिले.
अखेर विद्या मेश्राम या सिस्टरने जबाबदारी स्वीकारून प्रणय शडमाके यां मुलावर मलमपट्टी करून स्वतःची सुटका करून घेतली.
पोराला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर उपलिंतीवार हे निष्क्रिय. बेजबाबदार. वेळकाढू व निर्दयी वृत्तीचे असून.व्यक्ती पाहून उपचार करणारे डॉक्टर असल्याचे सांगितले जाते.
अश्या निष्क्रिय.. बेजबाबदार .डॉक्टरची सीरोंचा भामरागड या जंगल व्याप्त परिसरातत त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी प्रणय शडमाके यांच्या नातेवाहिकांनी केली आहे.
जिल्हाधिकारी. व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना एक दोन दिवसामध्ये तक्रात देऊन कारवाईकीची मागणी सुधा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शाळेकरी प्रणय यांच्यावर बाहेरील ट्रीटमेंट सुरू असल्याचे सांगितले जात आहे..
अश्या बेजबादार डॉक्टरवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे.

