उपोषणकर्त्या महिलांना बँकेचे नोटीस.
गडचिरोली.,(विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
चामोर्शी येथील अन्यायग्रस्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 फेब्रुवारी पासून आपल्या न्याय, हक्काच्या प्राप्तीसाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे.
उपोषणकर्त्यां महिलांच्या उपोषणाला सहा.ते सात दिवसाचा कालावधी लोटल्या जात असताना सुध्दा. अन्यायग्रस्त महिलांच्या आमरण उपोषणाची जिल्हा स्तरावर कुणी दखलही घेताना दिसत नाही.
अन्यायग्रस्त महिलांनी अगरबत्ती निर्मिती प्रकल्प सुरू करून .अंदाजे सहा महिन्याच्या कालावधी लोटला जात आहे.
सहा महिन्याच्या कालावधीमध्ये अगरबत्ती प्रकल्प बंद पडल्यामुळे आता प्रकल्पाच्या नावावर घेतलेल्या कर्ज वसुलीसाठी बँका महिलांना नोटीस पाठवीत असल्याचे उपोषणकर्त्या कडून सांगितले जात आहे.
उपोषणकर्त्या महिला आता मरणाला टेकलेल्या असून . शोषणग्रस्त पत्रकार परिषदेतून आपल्या प्रामाणिकपणाची व्यथा जनतेपुढे सादर करताना दिसत आहे.

