नवेगाव येथील महिलेवर अतिप्रसंग.आरोपींच्या अटकेची मागणी! समय्या पसुला.
गडचांदूर. (प्रतिनिधी) :
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मु. पोस्ट. नवेगाव, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर .येथील सौ. कविता भीमप्रकाश आखेवार.(वय 35 वर्ष) या मादगी समाजातील महिलेवर नामे कालिदास देशकर , रोशनी देशकर. अनिल नगराळे व पौर्णिमा नगराळे या चारही लोकांनी संगनमत करून अतिप्रसंग करण्याचा.व तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिला जीवे मारण्याची तसेच सबंधित महिलेला शेतामध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे महिलेकडून सांगितले जात आहे.
सदर या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बबलूजी आकेवार .डॉ समाया पशूला. तसेच अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री. शंकर पेगड पल्लीवार.यांनी पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या सोबत घेऊन दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून पोलीस प्रशासनाकडून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशीही करण्याची मागणी सुध्दा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.
तसेच पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्यासाठी समाज संघटनेनी स्वतः पुढाकार घेऊन व समाज संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, महिला आयोग महाराष्ट्र राज्य. तसेच मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई. येथे डॉ. समय्याजी पशुला संथापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मदगी संघटनेच्या लेटर पॅडवर एक लेखी निवेदन सुध्दा देण्यात आले.
या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांकडून गडचांदूर पोलीस स्टेशनला मेलद्वारे निर्देश पाठविण्यात आले.
त्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून. त्यांचे सविस्तर बयान नोंदवून रात्री सुमारे 8.30 वाजता पोलीस पथक, पीडित महिला, त्यांच्या कुटुंबीय व समाज संघटनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नवेगाव येथे घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी केली
.घटनास्थळी मुकानामा करून प्राथमिक चौकशी करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष समय्या पसूला यांच्याकडून सांगितले जाते.

