Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य ! दुर्गंधीचा महापूर!

जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य ! दुर्गंधीचा महापूर!

जिल्हा रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य ! दुर्गंधीचा महापूर!

गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून.रुग्णालयाच्या आजू बाजूच्या परिसरात दुर्गंधीचा महापूर ओसळताना दिसून येत आहे.

रुग्णालय परिसरातील संपूर्ण नाल्या घाणीने डबडबलेल्या असून. या नाल्यांचा उपसाच होत नसल्यामुळे .रुग्णालय परिसरातील संपूर्ण नाल्या घाणीने  डबडबलेल्या आहेत. अगोदरच डेंगू, मलेरिया,  कोरोना.या सारख्या जीव घेणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरलेला असताना. कुणाला केंव्हा या रोगाची लागण होईल? आणि कुणाचा जीव केव्हा जाईल ? हे सांगता येणार नाही.

रुग्णालय परिसराची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खांद्यावर टाकली असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालय परिसराकडे हेतुपुरस्सर डोळेझाक कताना दिसत आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय परिसरातील घाणेने भरलेल्या नाल्यांचा त्वरित उपसा करून रुग्णालय परिसर स्वच्छ करण्याची मागणी .रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या आणि वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या  लोकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular