जिल्हा सामान्य रुग्णालय बनू लागले रोगांचे माहेरघर ! दुर्गंधीचा महापूर!
गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून. दुर्गंधी च्या महापूराने संपूर्ण रुग्णालय परिस वेढलेला आहे.
अगोदरच डेंगू,मलेरिया. कोरोना या सारख्या जीव घेणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव सर्वत्रअसताना. कुणाला केंव्हा या रोगाची लागण होईल ?आणि कुणाचा जीव केव्हा जाईल? हे सांगता येणार नाही.
रुग्णालय परिसराची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खांद्यावर दिली असताना सुद्धा. सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालय परिसराकडे.व परिसरात निर्माण होणाऱ्या दुर्गंधीकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करून बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ.लोकहित.व सेवावृत्ती जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर रुग्णालयांची जबाबदारी न टाकता. निष्क्रिय. सुस्त.व वेळकाढू अधिकाऱ्यांकडे प्रशासनाची जबाबदारी दिल्यामुळे. जिल्हा सामान्य रुग्णालय अनेक रोगांचे माहेरघर बनताना दिसून येत आहे.
सेवाभावीवृत्ती अंगी जोपासणाऱ्या डॉक्टर मनिष मेश्राम यांचेकडे काही काळ रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी सोपविली असताना.
अहोरात्र रुग्णसेवेत आयुष वाहून घेणाऱ्या डॉ.मनीष मेश्राम यांना हटवून . निष्क्रिय अधिकाऱ्यांकडे प्रशासन सोपविण्यात आल्यामुळे आज.जिल्हा रुग्णालय आजारी अवस्थेत पडलेले आहे.

