ब्लड डोनरकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष.!
गडचिरोली ( 02 एप्रिल.)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
एका गरीब., निराधार रुग्णाची आयुष्मान भारत योजने अंतर्गत किडनीस्टोनची शस्त्रक्रिया करण्यासाठी सबंधित रुग्णाला रक्ताची नितांत गरज भासत असताना रुग्णाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी
दोन निःस्वार्थ.सेवाभावी व दानशूर वृत्तीच्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांनी सामान्य रुग्णालयातील ब्लडबँक मध्ये रक्त देण्यासाठी गेले असता .या दोन्ही व्यक्तींना ब्लडबँक कार्यालयामध्ये दीड ते दोन घंटे कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करावी लागली .
अकरा रुग्णांना रक्ताची नितांत गरज असताना ब्लडबँक मध्ये कार्यालयीन शासकीय यंत्रणेमध्ये ब्लड डोनरलाजर वागणूक मिळत असेलतर रक्त देण्यासाठी कोण पुढे येणार? असे ब्लडडोनरनी संतप्त व्यक्त केलेले आहे

