नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी 46 शिक्षकांच्या बदल्या केल्या. सुधीर गोहने यांची बदली का नाही ?
गडचिरोली ( जिल्हा प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
सुधीर गोहणे हे रामनगर परिसरातील नेहरू उच्च प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून..त्यांच्या शिक्षकी सेवेला अंदाज 24 वर्षाचा कालावधी होत आहे.
परंतु 24 वर्षांमध्ये कार्यकाळात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी आतापर्यंत 46 शिक्षकांच्या बदल्या केलेल्या असुन .एकाच शाळेत 24 वर्ष कार्यरत असलेल्या सुधीर गोहने यांची अजून पर्यंत बदली का झाली नाही ?
सुधीर गोहने यांची बदली प्रत्येक लोकांच्या मुखात चिंतनाचा विषय बनलेला आहे.
तक्रारदार म्हणतात की? सुधीर गोहने हे मुख्धिकारी यांच्या आगदी जवळचे व नाते सबंधातले असून या दोघांच्या संगनमताने नेहरू उच्च प्राथमिक शाळेत नियमबाह्य कामे सुरू असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यां कडून सुधीर गोहने यांची सतत पाठराखण करीत असल्याचे तक्रारदाराकडून सांगितले जात आहे.
तसेच तक्रारदारांनी सुधीर गोहने यांनी केलेल्या नियमबाह्य कामाच्या चौकशीची मागणी सुद्धा केली आहे.

