ग्रामपंचायत मुरमाडी समस्येच्या विळख्यात ! गावात घाणीचे साम्राज्य !
गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेली मुरमाडी ग्रामपंचायत अनेक समस्याने ग्रस्त असून गावात अंधाराचे व घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीच्या महापुराने गावाला वेडा घातलेला आहे.
नव्याने रुजू झालेल्या महिला ग्रामसेविका यांना प्रशासन व प्रशासकीय कामाची जानकारी नसल्यामुळे महिला ग्रामसेविका धास्तावलेल्या असून आपल्या ग्रामसेविका पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीला असल्याचे विश्वनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे .
मुरमाळी ग्रामपंचायतीला राजकीय पाठबळ असणाऱ्या प्रशासक अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.
प्रशासनाने मुरमाडी येथे कुशल प्रशासकाची नेमणूक करून गाव विकासाला प्रोसाहित करून गावातील समस्या दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

