Tuesday, August 18, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीवडसा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय बनू लागले शोपीस!

वडसा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय बनू लागले शोपीस!

वडसा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय बनू लागले शोपीस !

गडचिरोली,(विशेष प्रति)

विचारक्रांती न्यूज

संपादक

अनुप मेश्राम

वडसा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे लाखो रुपये खर्चून बांधलेले  वन कार्यालय शोपीस बनू लागल्याचे दिसून येत आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी आपल्या कार्यालया मध्ये कधीच बसताना दिसत नाही.

आपला कार्यालयीन प्रशासकीय कार्यभार आपल्या घरातून घरबसल्या चालवीत असल्याचे दिसून येत आहे

कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीला कधीच भेटताना . किंवा  त्यांची व्यक्तिगत समस्या ऐकून घेताना  कधीच दिसत नाही..

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क केला असता फोन करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याकडून कधीच प्रतिसाद  भेटताना दिसत  नाही.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नित्याच्या अनुपस्थिती मुळे वन अधिकाऱ्यांचे प्रशस्त कार्यालय काचबंद अवस्थेत  पडलेले असून जणू  शोभेची वास्तू बनू लागल्याचे दिसून येत आहे 

आमचे प्रतिनिधी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कार्याला अनेकदा भेटली असता .त्यांची काच बंद कार्यालयीन केबिन ही लॉक बंद अवस्थेत पडल्याची दिसून आली. हे विशेष 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular